| गोवे-कोलाड | वार्ताहर |
कोलाड क्रिकेट असोसिएशन संलग्न कोलाड प्रीमिअर लीग पर्व चौथेची क्रिकेट स्पर्धा शनिवार (दि.11) ते सोमवार (दि.13) साखळी पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत संघमालक निलेश गोरीवले याचा संघ विरा ऋग्वेद फाईटर प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ ठरला. या संघास रोख रक्कम 20,000/- व चषक देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, आरणा इलेव्हन संघ मालक प्रमोद म्हसकर यांना उपविजेतपदावर समाधान मानावे लागले. या संघास 15,000/- रु. व चषक व प्रेरणा हॉटेल संघ मालक रजिवळे तृतीय क्रमांक यांना 10,000/-व चषक देण्यात आले. या स्पर्धेत 12 संघमालकांनी सहभाग घेतला. यात 168 खेळाडूंचा सहभाग होता.
उत्कृष्ट गोलंदाज तिसे संघाचा मुरली बाईत- सोन्याची अंगठी व चषक, उत्कृष्ट फलदांज तिसे संघाचा प्रशांत खामकर- सोन्याची अंगठी व चषक. सर्वोत्कृष्ट खेळाडू- प्रेरणा हॉटेल संघाचा प्रेम कदम- स्पोर्ट्स सायकल बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कोलाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अलंकार खांडेकर, उपाध्यक्ष संतोष मोरे, सचिव संदेश दळवी, सहसचिव प्रथमेश खांडेकर, सहखजिनदार योगेश लोटणकर तसेच आजी-माजी अध्यक्ष व विश्वस्त, कोअर कमिटी मेंबर्स यांच्या उपस्थित स्पर्धा धूमधडाक्यात यशस्वी पार पडली. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रत्येक सामन्याचे यू ट्यूब लाईव्ह आणि आय स्पोर्ट्स इन्स्टाग्रामवर इन्स्टंट अपडेटड फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूच्या निगडित म्हणजे क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, फलंदाजी याबाबतचे अपडेट यामुळे आपल्या खेळाडूंची खेळी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याच्या बाहेर लक्ष वेधून घेतले आहे.