भाजी विक्रेती कोर्लईची माय

। रेवदंडा । प्रतिनिधी ।

अलिबाग, रोहा, मुरूड, पेण, महाड, श्रीवर्धन, तळा, माणगांव आदी तालुक्याच्या भाजी मार्केटसह गावागावात ताजी भाजी, विविध कडधान्य, रताळी, कलिंगड, काकडी, जिबूड आदीची विक्री करताना एका वैशिष्टपुर्ण ख्रिश्‍चन पेहरावात व आगळी वेगळी भाषा बोलणारी कोर्लईची माय सर्वश्रुुत आहे. कोर्लईमध्ये उत्पन्न घेतली जाणारी भाजी, कडधान्ये, व रताळी विक्री करता कोर्लई ख्रिश्‍चन पाडयातील कोर्लईची माय प्रत्येक भाजी मार्केटमध्ये नित्याने आढळते. या कोर्लई ख्रिश्‍चन मायची आगळी वेगळी अशी क्रिओल भाषा, कोर्लई ख्रिश्‍चन बांधव या भाषेस नौ लिन्ग (आमची भाषा) बोलत असतात. त्यामुळे ते निश्‍चित लक्ष्य वेधून घेतात. नित्याने भाजी मार्केटमध्ये आढळणारी कोर्लईची माय सर्वश्रूत असून कोर्लईची प्रसिध्द ताजी भाजी, कडधान्य, विशेष म्हणजे रताळी ग्राहकांपर्यंत पोहचवत असते.

Exit mobile version