। चौक । वार्ताहर ।
चौक बाजारपेठेमध्ये रस्त्याच्या कडेला बसणार्या भाजी विकणार्यांवर अपघाताचा धोका संभावत आहे. चौक बाजारपेठेमध्ये रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला, रस्त्याच्या दुतर्फा अथवा कडेला अनेकजण ताजी गावठी भाजीपाला विकण्यासाठी बसतात. जे भाजी विक्रेते वळणावर बसतात त्यांना जास्त धोका निर्माण झाला आहे. तुपगावकडून चौक बाजारपेठेमध्ये मोठा टँकर पोलीस ठाण्याच्या दिशेने जाताना कोपर्यावर भाजीची टोपली घेऊन बसलेल्या महिलांच्या टोपली वरून जाता जाता राहिला. शेजारीच वृत्तपत्र विक्रेते नरेंद्र पारठे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी वळणार्या टँकरला थांबून भाजीच्या टोपल्या उचलल्यामुळे अपघात होता होता राहिला.