। पंढरपूर । प्रतिनिधी ।
धारूर येथून परभणीकडे निघालेल्या वाहनाचा ३० फूट दरीत कोसळून खामगाव-पंढरपूर महामार्गावर अपघात झाला. या अपघातात २ जण जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. धारूर घाटात असलेल्या म्हसोबा मंदिराजवळील तीव्र उतारावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.
अपघातात दोघेही प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढून बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. धारूर घाटात सुरक्षेसाठी कुठलीच व्यवस्था नसल्याने या ठिकाणी हे वारंवार अपघात होत आहेत. तसेच या घाटात काही ठिकाणी कव्हरेज नसल्याने देखील अपघात झाल्यावर वैद्यकीय सेवा भेटण्यास विलंब होतो. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे नागरिकांकडून कळाले आहे.






