झाड कोसळून वाहनांचे नुकसान

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यामुळे खांदा वसाहत सेक्टर 9 येथे फूटपाथलगत उभे असलेले एक मोठे वृक्ष मुळासकट उन्मळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस कोसळले. या घटनेमुळे काही काळ संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. झाड कोसळताना रस्त्यालगत पार्किंग केलेल्या सुमारे सहा चारचाकी वाहनांवर ते आदळल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त वाहनांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स प्रशिक्षण देणाऱ्या आणि एन.पी. मोटर्स या संस्थेच्या वाहनांचा समावेश असून, विक्रीसाठी ठेवलेल्या काही गाड्यांचेही नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी झाड कापून हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. त्यामुळे परिसरातील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. या घटनेनंतर परिसरातील धोकादायक व जीर्ण वृक्षांचे सर्वेक्षण करून वेळेत छाटणी व आवश्यक ती उपाययोजना करावी, तसेच पार्किंगच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Exit mobile version