निष्कृष्ट कामाकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष
। बोर्लीपंचतन । प्रतिनिधी।
गुरुवारी रात्री नालासोपार्या जाणारी एस्टी जीओ केबलसाठी खणलेल्या खड्ड्यात रूतली आहे. तिला बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टर व जेसीबीने प्रयत्न केले असता एसटीचा हुक तुटुन बाहेर पडल्यामुळे ही एसटी बाहेर काढता आली नाही. अशा प्रकारच्या रोजच घटना घडत आहेत.
पावसाळा तोंडावर असताना केबल टाकण्यास सुरुवात झाली. ज्या रस्त्यावरुन नियमित वाहने वाहतुक करणारे रोड टॅक्स भरीत असतात. पण त्याच रस्त्याची देखभाल करणारे बांधकाम खाते हा निधी खराब रस्त्यावर करीत नाही. त्यामुळे रोजच या रस्त्यावर गाड्या चिखलात रूतत आहेत. पावसाळा सुरु झाल्यापासुन नियमीत अवजड वाहने खचत आहेत. तरीही बांधकाम खाते भानावर येत नाही, ही मोठी शोकांतीका आहे.