| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात असलेल्या कल्याण-कर्जत राज्यमार्गावरील वेणगाव ते दहिवली गाव या रस्त्याच्या भागात काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या रस्त्यावरील काँक्रीटीकरण कामाला वेग आल्यामुळे हा रस्ता सुसाट होणार आहे.
कर्जत तालुक्यातील चिंचवली ते कोंदिवडे हा राज्यमार्ग कर्जत तालुक्यातील मोठा भाग जोडणारा समजला जातो. या राज्यमार्ग रस्त्यावरील वेणगाव हे गाव कर्जत शहराला लागून असलेले गाव आहे. त्यामुळे या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली आहे. या रस्त्यावर सध्या वेगाने काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. या नव्याने बनत असलेल्या रस्त्यामुळे मोठे वेणगाव आणि धाकटे वेणगाव हि गावे कर्जत शहराच्या आणखी जवळ येणार आहेत.







