पार्किंगमध्ये उभ्या दुचाकींना आग

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील देवद येथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन दुचाकींना आग लागल्याची घटना घडली. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. देवद येथील त्रिमूर्ती श्‍लोक इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी असलेल्या टिव्हीएस मोटारसायकलला अचानक आग लागली.

तसेच त्या आगीची झळ पेट घेतलेल्या गाडीच्या बाजूला असलेल्या होंडा मोटारसायकलला देखील बसली आहे. आग लागल्याचे समजताच सोसायटीच्या रहिवाशांनी धावत जाऊन आग विझवली. मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. याबाबत खांदेश्‍वर पोलिसांना माहिती देण्यात आली असून सोसायटीत लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे खांदेश्‍वर पोलिसांनी माहिती घेऊन संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version