| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत निवडणुकासाठी 80.08 टक्के मतदान झाले आहे.
वेश्वी मध्ये एकूण चार प्रभागात ही निवडणूक लढली जात आहे. थेट सरपंच पदासाठी शेकापक्षचे प्रफुल्ल पाटील यांच्यासह दोन उमेदवार रिंगणात असून 11 सदस्यांसाठी 22 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.
एकूण 3 हजार 625 मतदार असून त्यात पुरुष 1 हजार 805 तर स्त्री 1 हजार 820 मतदार आहेत. त्यापैकी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 2 हजार 903 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 1 हजार 455 पुरुष तर 1 हजार 448 महिला उमेदवारांचा समावेश आहे.