| उरण | वार्ताहर |
उरण बोरी येथील साई संस्थेच्या नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलमध्ये जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य विभाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण यांच्या सौजन्याने माता सुरक्षीत तर घर सुरक्षीत अभियांतर्गत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी ( 18 ऑक्टोबर) सकाळी 10 ते 12:30 व दुपारी 1: 30 ते 4 वाजेपर्यंत असे दोन सत्रात हे शिबीर होणारआहे.
पूर्णपणे मोफत असणार्या या वैद्यकीय शिबिरांतर्गत माता,स्तनदा माता,किशोर वयीनमुली यांना विशेष मार्गदर्शन करण्यात येवून त्यांच्या समस्यांचे निरसन करण्यात येणार आहे.त्याबरोबर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या तपसणी अंतर्गत रक्त दाब,ब्लड शुगर (मधुमेह), थायरॉईड फंक्शनल टेस्ट,लिव्हर फंक्शनल टेस्ट लिपीड प्रोफाईल ,रीनल फंक्शनल टेस्ट ,आर.ए.फॅक्टर,आदिची तपासणी करण्यात येणार आहे. शिबिराचा माता-भगिनींनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा असे आव्हान साई संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील व वैद्यकीय अधिक्षक डॉ.बाबासो काळेल यांनी केले आहे.