जुने कार्यकर्ते स्वगृही परतले; शेतकरी भवनमध्ये जल्लोषात स्वागत

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |


अलिबागमधील गोविंद बंदर येथील काही कार्यकर्ते गैरसमजुतीमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटात गेले होते. मात्र, चार दिवसांत हे कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबियांसमवेत पुन्हा शेतकरी कामगार पक्षात सामील झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी घरवापसी केल्याने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अलिबागचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा शेतकरी भवन येथील सभागृहात बुधवारी (दि. 1) दुपारी मोठ्या उत्साहात झाला. जुन्या कार्यकर्त्यांच्या घरवापसीमुळे ठाकरे गटातील नगरसेवकांना चपराक बसली.

यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, माजी नगराध्यक्ष सतीश प्रधान, माजी नगरसेविका वृषाली ठोसर, संजना किर, महेश शिंदे, पाणी सभापती अनिल चोपडा, नगरसेविका सुषमा पाटील, अश्विनी ठोसर, ॲड. निवेदिता वाघमारे, ॲड. ऋषीकेश माळी, जमाल सय्यद, अलिबाग पुरोगामी युवक अध्यक्ष विक्रांत वार्डे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी कामगार पक्षातील इस्माईल मोहद्दीन सय्यद, सल्लाउद्दीन गायसुद्दीन शाह, कामरुद्दीन गयाउद्दीन शाह या कार्यकर्त्यांनी गेल्या चार दिवसांपूर्वी गैरसमजुतीमधून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा या तीन कार्यकर्त्यांसह त्यांच्या कुटुंबियांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. इस्माईल मोहद्दीन सय्यद, सल्लाउद्दीन गायसुद्दीन शाह, कामरुद्दीन गयाउद्दीन शाह या जुन्या कार्यकर्त्यांचा गैरसमज दूर होऊन अवघ्या चार दिवसांमध्ये ते स्वगृही परतले आहेत. त्यामुळे ठाकरे गटातील नगरसेवकांना चांगलीच चपराक बसली आहे. इस्माईल सय्यद, सल्लाउद्दीन शाह, कामरुद्दीन शाह यांनी बुधवारी (दि.1) शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

ठाकरे गटाच्या नगरसेवकाला चपराक
गोविंद बंदर येथील शेकापचे जुने कार्यकर्ते काही गैरसमजुतीमधून शिवसेनेत गेले होते. त्यांचा गैरसमज दूर होऊन चार दिवसांमध्ये स्वगृही परत आले आहेत. त्यामुळे ठाकरे गटातील नगरसेवकांना चपराक बसली असल्याची प्रतिक्रीया माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी व्यक्त केली.
Exit mobile version