आ. जयंत पाटील यांनी केले स्वागत
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील शिवसेनेतील कार्यकर्ते पुन्हा स्वगृही म्हणजेच शेतकरी कामगार पक्षात परतले आहेत. या कार्यकर्त्यांचा आज अलिबाग येथील शेतकरी भवन येथे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. शेकापचे नेते स्व सीताराम दसवते यांचे सुपुत्र शिवसेनेचे खरवली विभाग प्रमुख स्वप्नील दसवते यांच्यासह खरवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष सकपाळ, दीपक तांबट, शशिकांत घुळघुळे, सुभाष अर्बन, श्रीकांत घुळघुळे, निलेश घुळघुळे, शरद भावे, मिलिंद सोनकर, सुरेश शेडगे यांनी आज शेकापक्षात प्रवेश केला. यावेळी शेकापक्षाचे कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक, जिल्हा परिषद माजी सदस्य अस्लम राऊत, तालुका चिटणीस रमेश मोरे, तालुका कार्यालयीन चिटणीस राजेश कासारे, खरवली उपसरपंच नथुराम अडीत, विभागीय चिटणीस विलास मोरे, निजाम पोपलनकर आदी उपस्थित होते.