ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबई- मराठी सिनेमांमध्ये पिंजरा हा आयुकॉनिक मुव्ही मानला जातो. या सिनेमात आपल्या बहारदार नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम या काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. नुकतेच त्यांचे निधन झाले आहे. त्या 94 वर्षांच्या होत्या. संध्या या सुप्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्या अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्यांच्या नृत्याने रंगलेली अनेक गाणी आजही लोकांच्या ओठी आहेत. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. संध्या यांनी एक पर्व त्यांच्या नृत्याने गाजवलं होतं. त्यांच्या अभिनय आणि नृत्याने रंगलेला पिंजरा हा सिनेमा आजही मराठीतीतील क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. काल संध्याकाळी राजकमल स्टुडिओत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. अमर भूपाळी, दो आँखे बारह हात, नवरंग, जल बिन मछली नृत्य बिन बिजली हे त्यांचे काही गाजलेलं सिनेमे आहेत.

Exit mobile version