। मुंबई । वृत्तसंस्था ।
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे शनिवारी (12 मार्च) दुपारी निधन झाले. वत्सला देशमुख या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या आई होत्या. वत्सला यांनी आपल्या करिअरची सुरुवात तुफान और दिया या हिंदी चित्रपटातून केली. त्यांचे फायर, नागपंचमी, जल बिन मछली नृत्य बिन बिजली असे अनेक चित्रपट गाजले होते. पण सुहाग या चित्रपटातून त्यांना खर्या अर्थाने ओळख मिळाली. त्यांनी पिंजरा आणि नवरंग चित्रपटातसुद्धा काम केले होते. आई, मावशी, काकू, आजी अशा विविध भूमिकेतून त्या प्रेक्षकांसमोर आल्या. वत्सला यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.