। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई क्रिकेट असो.च्या संयुक्त विद्यमाने आयोजित इन्शुरन्स शील्ड टी-20 क्रिकेट स्पर्धेत अजंता फार्मा एससीने बीएमसी स्पोर्ट्स क्लबवर 27 धावांनी विजय मिळवला आहे. क्रॉस मैदानावर खेळलेल्या या रोमांचक सामन्यात अजंता फार्मा एससीने 20 षटकांत 5 बाद 144 धावा केल्या. रोहन गुढेकरने 40, जतीन घरतने 39, संकेत काष्टेने नाबाद 29 आणि ओंकार रिळकरने 22 धावांची महत्त्वाची खेळी केली.
145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बीएमसी स्पोर्ट्स क्लबच्या ऋषिकेश पाटकरने 47 आणि स्वप्नील भोसलेने 46 धावांची जोरदार लढत दिली. तरीही, आरिश खान (2/5) आणि जयेश म्हात्रे (2/18) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे बीएमसी स्पोर्ट्स क्लबला 20 षटकांत 6 बाद 117 धावा करता आल्या आणि त्यामुळे अजंता फार्मा एससीने 27 धावांनी विजय मिळवला. दुसर्या सामन्यात युनायटेड पटनी इंडस्ट्रीज एससीने इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्सला 4 गडी राखून पराभूत केले.