विजय चवरकर यांचे निधन

| अलिबाग | जिल्हा प्रतिनिधी |

विजय नारायण चवरकर यांचे 68व्या वर्षी निधन झाले. विजय चवरकर हे 11 मार्च रोजी स्कूटीवरून येत असताना त्यांना चक्कर आल्यामुळे ते स्कुटीवरून पडले. त्यानंतर 1 महिना ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते. मात्र, रविवारी (दि.12) त्यांचे निधन झाले. विजय चवरकर हे एक उत्तम पत्रकार होते. शेतीचा त्यांना गाढा अभ्यास होता. त्यांच्या शिवारात ते विविध प्रकारची फुले, भाजीचे मळे, ड्रॅगन फ्रुट लागवड, पपई, सुपारी, सूर्यफूल, झेंडू अशी विविध प्रकारची लागवड सुरु असायची. कबड्डी स्पर्धेत ते उत्तम समालोचन करायचे. त्यांना भजन, कीर्तन याची देखील खूप आवड होती. ते दरवर्षी वारी करत पंढरपूरला जायचे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नात असा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी मंगळवारी (दि.21) तर तेरावं शुक्रवारी (दि.24) त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे चवरकर कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version