| पुणे | वार्ताहर |
बारामती लोकसभेला अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेला अपक्ष उतरणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासंदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून त्यामुळे बारामती लोकसभेला तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. या निर्णयाने शिंदे आणि अजित पवार गटातही ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.
आज (दि. 13 ) सासवडमध्ये माजी आमदार विजय शिवतारे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत शिवतारे यांच्या उमेदवारीचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे विजय शिवतारे बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगतिले. विजय शिवतारे यांच्या भूमिकेनं बारामतीत महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत.