विक्रम रिक्षा चालक-मालक संघाचे उद्यापासून उपोषण

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील विक्रम मिनिडोअर चालक, मालकांच्या आरटीए, एमएमआरटीए क्षेत्रातील प्रलंबित न्यायिक मागण्या सोडविल्या जाव्यात यासाठी गुरुवारी (दि.10) अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुुरु करणार आहेत, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.

या संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात अनेक प्रलंबित मागण्यांचा उहापोह करण्यात आला आहे. शासनस्तरावर या मागण्यांची पुर्तता तातडीने केली जावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

Exit mobile version