चोरढे येथे ग्रामस्वच्छता

| चणेरा | प्रतिनिधी |

रा.जि.प.शाळा चोरढे येथे भारतरत्न लाल बहादूर शास्त्री आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामस्वच्छता अभियान करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगिता भगत, विजय जाधव, राजेंद्र नाईक, रमेश सुभेदार, इर्शाद बैरागदार, ग्रामस्थ, पालकवर्ग, विद्यार्थी, शिक्षक वृंद, अंगणवाडीताई यांची उपस्थिती लाभली. यावेळी ग्रामपंचायत, मच्छिमार्केट, स्मशानभूमीपर्यंत गाव दुतर्फा स्वच्छ करण्यात आला. यावेळी 12 पिकअप कचरा जमा करण्यात आला. मोहीम यशस्वी करण्यासाठी सुनील घाग, सुरेश तांबडे, संदीप घाग, नरेंद्र कोटकर, मंगेश घाग, रंजना शेडगे, निकिता डोलकर, प्रमोद चोरढेकर, लीना तांबडे, अश्विनी घाग, माधुरी शेडगे, स्वाती टावरी, रवींद्र भोपी तसेच चोरढे, सावरोली, वेताळवाडी या गावातील ग्रामस्थांचा सहभाग लाभला. तर रुपेश घाग यांनी कचरा उचलण्यासाठी मोफत टेम्पो दिला. नरेश तांबडे यांच्याकडून पिण्याचे पाणी दिले. पद्माकर चवरकर यांनी गवत कापणी यंत्र दिले.या सर्वांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

Exit mobile version