गावठी दारू बनावटीच्या बंदुकी जप्त

। अलिबाग । वार्ताहर ।
रायगडात दोन ठिकाणी गावठी दारू बनावटीच्या बंदुकी जप्त झाल्या. सारसन गांवचे हददीत असोशिऐट रियल इस्टेट जवळ खोपोली येथे 03 आरोपित रा.ठाकूरवाडी खोपोली खालापूर यांनी विनापरवाना गैरकायदेशिर रित्या एक नळी ठासणीची गावठी बनावटीची बंदुक आपले ताबे कब्जात बाळगलेल्या स्थितीत मिळुन आले. 4 हजार रुपये किमतीची बंदूक व 15 हजार रुपये किमतीची मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली आहे. गोयंडावाडी येथे 4 हजार रुपये किमतीची गावठी बनावटीची एक नळी ठासणी बंदुक व त्यास ठासण्याकरीता लागणारी बारी दारू, लोखंडी छरे व इतर साहीत्य बाळगलेला मिळाला. सदर आरोपीला दि. 15 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. दोन्ही गुन्ह्यांबाबत सदर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Exit mobile version