डोलवी उड्डाण पुलासाठी गावाने एकत्र यावे

| पेण | प्रतिनिधी |

पेण विधानसभा मतदार संघाचा आमदार ठरवण्याची ज्या गावामध्ये ताकद आहे, त्या डोलवी गावाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकीकरणाने वार्‍यावर सोडले आहे. जगातील तिसर्‍या नंबरचा पोलाद कारखाना ज्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आहे, त्या डोलवी ग्रामपंचायतीच्या डोलवी गावाचे मुंबई गोवा महामार्गामुळे दोन भागामध्ये विभागला गेला आहे. त्यामुळे गावाचे दोन तुकडे झाले आहेत. ज्या गावाची ओळख श्रीमंताचा गाव म्हणून केली जाते परंतु या गावात राजकीय अस्थिरता असल्याने मुंबई गोवा महामार्गावर त्यांना उड्डाण पुल सुध्दा मंजूर करून घेता येत नाही. या गावाने ठरविले तर स्वतः स्वतासाठी उड्डान पुल स्वखर्चाने तयार करून घेऊ शकतात.

सहा महिन्यापूर्वी ज्या वेळेला या गावाच्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणूकीमध्ये निवडून येणारे निवडून आले पडणारे पडले. जाहिरनामे वचन नामे केराच्या टोपलीत गेले. परंतू महामार्गावर ना उड्डान पुलाची मंजुरी मिळाली ना उड्डान पुल झाले. पेण तालुक्यात ज्या गावाने गेली चार दशके तालुक्याचे पुढारपण केले जिल्हा परिषदेचा आरोग्य तथा बांधकाम सभापती पद भूषवीले. एक दोन नव्हे तर एक तालुक्याचा सभापती, दोन जिल्हा परिषदेचे सभापती, पाच जिल्हा परिषद सदस्य असे राजकीय ताकद असताना आज गावातील नागरिकांना स्मशानभूमीकडे जाण्यासाठी उड्डाण पुल नाही. गावातून अंत यात्रा निघाली तर महामार्गावरून जात असताना नागरिकांना जीव मुठीत धरावा लागतो.

शासनाबरोबर कित्येक वेळा पत्र व्यवहार डोलवी बायपास संदर्भात केला आहे. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील बांधकाम मंत्री असताना मी स्वता: पुढाकार घेऊन या संदर्भात पत्रव्यवहार केला आहे. आता रविंद्र चव्हाणांबरोबर पत्र व्यवहार झालेला आहे. परंतू शासनाला डोलवी बायपासला मुहुर्त मिळत नाही. शासन पूर्ण डोलवी गावा बाबत उदासिन आहे

प्रभाकर म्हात्रे
माजी जिल्हा परिषद सदस्य

Exit mobile version