| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील आंबेळी येथे डम्पिंग ग्राऊंड करण्यास राणेचीवाडी ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांकडून नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले आहे. आंबेळी येथील गावठाण जागा शासनाने भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून भविष्यात घरे तसेच गुरांचे गोठे बांधण्यासाठी राखीव ठेवली आहे. मात्र, नगरपंचायतीकडून त्या जागेवर डम्पिंग ग्राऊंड बांधण्याचा विचार असून, तसे झाल्यास शेजारी असलेल्या राणेची वाडी, आंबेळी बौद्धवाडी ग्रामस्थांना त्याचा त्रास होणार आहे.
तसेच भविष्यात त्या कचर्यामुळे पिण्याचे पाणी, मानवी आरोग्य, गुरांचे आरोग्य अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या जागेवर बांधण्यात येणारा डम्पिंग ग्राऊंड अन्य ठिकाणी हलविण्यात यावे, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. याप्रसंगी नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, पाणीपुरवठा सभापती मंगेश शिगवण, नगरसेवक भास्कर गोळे तसेच राणेची वाडी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.