| नेरळ | वार्ताहर |
मुरबाड-कर्जत रस्त्याने नेरळ आणि माथेरानकडे येण्यासाठी असलेल्या नेरळ-कळंब रस्त्यावर मोठे भगदाड पडले आहे. पोही गावाच्या पुढे सिनियर सिटीझन ट्रस्टकडे जाणार्या रस्त्याच्या वळणावर हा खड्डा मुख्य रस्त्यावर पडला आहे. नेरळ-कळंब रस्त्यावर पोही गावाच्या पुढे नेरळकडे येताना असलेल्या रस्त्याच्या सिनियर सिटीझन ट्रस्ट आहे. या ट्रस्टच्या वळणावर रस्त्यावर खड्डा पडला आहे. त्याबद्दल स्थानिक कार्यकर्ते दिनेश भोईर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली आहे.
त्या खड्ड्यात कोणताही वाहनचालक जाऊन आदळू नये आणि अपघात होऊ नये यासाठी स्थानिकांनी झाडाच्या फांद्या आणि दगड उभे करून ठेवले आहेत. त्या रस्त्यावर रात्रीदेखील वाहतूक असते आणि त्यामुळे वाहनचालक यांनी रात्रीच्या वेळी वाहने चालविताना काळजी घायवी, असे आवाहन दिनेश भोईर यांनी केले आहे.