गावठी दारूने भरलेली गाडी हस्तगत

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | वार्ताहर |

पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गजानन गाडगे यांना एका चारचाकी गाडीतून गावठी दारू नेत असल्यची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश धुमाळ, सुनील कुदळे, सतीश तांडेल, शिवाजी बाबर, विजय देवरे, भूषण महारसे, पोलीस शिपाई आकाश भगत व भीमराव खताळ आदींच्या पथकाने सापळा रचून संबंधीत (एमएच-03-ए झेड-1954) गाडी थांबवून तिची झडती घेतली. त्यावेळी त्या गाडीत विना परवाना मोठ्या प्रमाणात गावठी दारूचे टायर बाळगून त्याची विक्री करण्याकरता नेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संबंधित गाडीचालक अविनाश रसाळ याला गाडीसह ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी पनवेल तालुका पोलिसांनी जवळपास 3 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Exit mobile version