| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ गटाच्या दोन दिवसीय कसोटी फॉरमॅट नुसार घेण्यात येणाऱ्या क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांचे सध्या रायगड जिल्ह्यातील विविध मैदानांवर आयोजन करण्यात येत असून, पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर महाराष्ट्राचे पहिले युवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच (आयसीसी व बीसीसीआयचे पॅनल पंच) विनीत कुलकर्णी व महाराष्ट्र क्रिकेट पंच असोसिएशनचे अध्यक्ष अजय देशपांडे यांची एमसीएतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पुढाकाराने एमसीएच्या सामन्यांचे आयोजन रायगड जिल्ह्यातील पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान, रसायनी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्सच्या मैदान, गव्हाण उलवे येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान, बेलापूर येथील सिडकोच्या मैदानावर ह्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षात रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 60 दोन दिवसीय कसोटी फॉरमॅट नुसार क्रिकेट सामन्यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.एमसीएच्या वतीने विनीत कुलकर्णी व अजय देशपांडे या दोन दिग्गजांची नियुक्ती सध्या रायगड जिल्ह्यातील मैदानाच्या व खेळपट्टीच्या स्तराची व दर्जाची पाहणी करण्यासाठी केली आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील क्रिकेट खेळला चालना देण्यासाठी अथक परिश्रम घेतले असून प्रत्येक वयोगटातील मुलामुलींची निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर निवड करण्यासाठी स्पर्धेंचे आयोजन केले आहे.गेल्या दोन वर्षात आरडीसीएच्या वतीने जवळपास 600 एकदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
एमसीएच्या सामन्यांसाठी विनीत कुलकर्णी यांची नियुक्ती
