। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत कर्जत तालुक्यातील वडवली येथील घरासमोरील बांधलेला कठडा काढून रस्ता करून देण्याकरता झालेल्या भांडणाचे स्वरूप मारामारीत झाले याबाबत कर्जत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत 17 फेब्रुवारी रोजी 7 वाजण्याच्या सुमारास कर्जत तालुक्यातील वडवली येथे राहणारे विकास हरड यांचे राहत्या घरासमोर बांधलेला कठडा काढुन रस्ता करुन देण्याकरिता विकास हरड व त्यांचा भाचा यांना कैलास पवार व वैभव ऊर्फ विकी पवार यांनी शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी देत लोखंडी रॉडने मारहाण केली. विकास हरड व त्यांचे सोबतचे इतर लोक कर्जत पोलीस ठाणे येथे तक्रार देण्याकरीता रात्री 09:30 वाजण्याचे सुमारास आले.
कैलास पवार व वैभव पवार यांनी आपसात संगनमत करुन इतर जणांना बोलावून घेतले साक्षीदार रोशन मराडे यांच्या अंगावर येऊन लोखंडी कोयता व रॉडने मोहन मराठे, रोशन मराठे, प्रथम मराठे, हितेश घूडे व विकास हरड यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. मोहन मराडे याचे डोक्यावर कोयत्याने मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कर्जत पोलिसांनी 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास कैलास राजेंद्र पवार, वैभव उर्फ विकी दत्ता पवार, दत्ता मारुती पवार, सोनू राजेंद्र पवार सर्व राहणार वडवली या चार जणांना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रायगडचे जिल्हाधिकार्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन केले आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे करीत आहेत.