| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
नवरात्रीमध्ये सर्वत्र रास गरब्याची क्रेझ आहे. अलिबाग येथील मासळी मार्केटमध्ये देखील एकविरा देवीचे पूजन केले जाते. बुधवारी या मार्केटमधील मच्छीमार महिलांनी सुरू असलेल्या गाण्यावर अचानक ताल धरला. मासळी बाजारात टिपऱ्या कुठून आणणार म्हणून या महिलांनी आपल्या पाटीवरील मासेच हातात घेत अनोखा गरबा नृत्य खेळण्यास सुरुवात केली.
पापलेट, सुरमई, रावस, हलवा या एकापेक्षा एक मासे हातात घेत फेर घालत नृत्यात साऱ्या जणी रममाण झाल्या. याचे कोणीतरी मोबाईलमध्ये चित्रण केले आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले. काही वेळातच ते तुफान व्हायरल झाले.
