मुंबईत विशाल किसान-मजदूर महापंचायतीचे आयोजन

3 नोव्हेंबरला शेकाप कार्यालयात आढावा बैठक
मुंबई | प्रतिनिधी |
महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनी आणि ऐतिहासिक देशव्यापी शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुंबईत आझाद मैदान येथे रविवारी 28 नोव्हेंबर रोजी,एक विशाल संयुक्त किसान-मजदूर महापंचायत आयोजित करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाची तयारी करण्यासंदर्भात बुधवारी 3 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता शेकाप कार्यालय, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई येथे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या महापंचायतीच्या निमित्ताने लखीमपूर खेरीच्या शहिदांच्या अस्थिकलशांचे विसर्जन हुतात्मा चौकात केले जाईल. त्यापूर्वी 27 नोव्हेंबर रोजी हे अस्थिकलश मुंबईतील काही ऐतिहासिक ठिकाणी संयुक्तपणे नेले जाणार आहे.या दोन्ही कार्यक्रमांची आखणी व नियोजनासंबंधी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी संयुक्त बैठक बोलावली आहे. त्यास आपण स्वतः अथवा आपल्या संघटनेचा एक प्रमुख नेता अवश्य पाठवावाअसे आवाहन संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जनआंदोलनांची संघर्ष समिती, हम भारत के लोग/नेशन फॉर फार्मर्स आदी संघटनानी केलेले आहे.

Exit mobile version