विष्णु म्हात्रे यांचे निधन

। रसायनी । वार्ताहर ।

मोहोपाडा येथील विष्णू मंगळ्या म्हात्रे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 64 वर्षाचे होते. 1973 पासून ते मोहोपाडा येथे टेलरिंगचा व्यवसाय करीत होते. विष्णू म्हात्रे यांच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात रिस येथील स्मशानभुमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्‍च्यात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी रविवारी (दि.21) गुळसुंदे येथे तर तेरावे गरूवारी (दि.25) मोहोपाडा येथील निवासस्थानी होणार आहे.

Exit mobile version