पारंपरिक कारागिरांना मिळणार लाभ
| नवी दिल्ली| वृत्तसंस्था|
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा योजनेचे आज लोकार्पण केले. या योजनेमुळे पांरपरिक कारागिरांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. या योजनेमध्ये एकूण 18 प्रकारच्या कारागिरांचा समावेश करण्यात आला आहे. दिल्लीत कारागिरांच्या सभेला त्यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी योजनेची माहिती दिली. विश्वकर्मा योजनेअंतर्गत भारतीय कारागिरांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार कारागिरांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल. विशेष म्हणजे विना हमी विना तारण हे कर्ज दिले जाणार आहे. तसेच या कर्जाचे व्याजदर अत्यंत कमी असणार आहे. त्यामुळे कारागिरांना याचा मोठा फायदा होणार आहे.
18 प्रकारच्या कारागिरांना लाभ
18 प्रकारचे काम करणाऱ्या कारागिरांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. सुतार, सोनार, मुर्तिकार, धोबी, कुंभार, लोहार अशा वेगवेगळ्या कारागिरांना याचा लाभ होणार आहे. सरकार या योजनेवर 13 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. कारागिरांना 3 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. कोणत्याही हमीशिवाय हे कर्ज त्यांना देण्यात येईल. सुरुवातील 1 लाखांचे कर्ज देण्यात येईल. कर्ज फेडण्यात आल्यास दोन लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे . पहिले एक लाख बिनव्याजी तर नंतरच्या दोन लाखघंवर पाच टक्के व्याज आकारले जाणार आहे.