विश्वनाथ पाटील यांनी नवीन विक्रमाकडे वाटचाल

प्रजासत्ताक दिनी मारणार 5575 बैठका

| रायगड | खास प्रतिनिधी |

रायगड पोलिस दलातील निवृत्त पोलिस उपनिरीक्षक विश्वनाथ पाटील (वय 66 वर्षे) यांनी नवीन विक्रम रचण्याची तयारी केली आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनामित्त शुक्रवारी 26 जानेवारी रोजी पाटील हे 5575 बैठका मारण्याचा पयत्न करणार आहेत.

अलिबाग यएथील पोलिस परेड मैदानावर पाटील पहाटे 4 वाजल्यापसून बैठका मारायला सुरूवात करतील. सकाळी सव्वा नऊ वाजता प्रजासत्ताक दिनाची परेड सूरू होईपर्यंत ते बैठका मारतील. या कालावधीत 5575 बैठका मारण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. यापूर्वी पाटील यांनी वयाच्या 50 व्या वर्षी 6215 बैठका मारण्याचा विक्रम केला होता. त्यांनी वयाच्या 54 वर्षी 3253 सूर्यनमस्कार मारले होते. वयाच्या 61 व्या वर्षी त्यांनी 30 हजार 720 दोरीउड्या मारण्याचा विक्रम केला होता. वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त होण्याच्या दिवशी अलिबाग ते पेण व परत पेण ते अलिबाग असा न थांबता 64 किमी धावण्याचा विक्रम देखील त्यांनी केला होता. भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनामित्त विश्वनाथ पाटील 5575 बैठका मारण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला तर त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदविला जाणार आहे.

Exit mobile version