। रोहे । वार्ताहर ।
साई फाऊण्डेशन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या सहयोगाने रोहे तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी-राजखलाटी विद्यालयास संगणक संच भेट देऊन आपली वचनपूर्ती केली आहे.
गत दोन वर्षांपूर्वी सदर विद्यालयाचे वतीने विद्यालयास संगणक संच मिळावा यासाठी साई फाऊण्डेशन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे चेअरमन डॉ.असिफ कासकर यांना निवेदन देण्यात आले होते.त्या निवेदनाची दखल घेऊन सदर संगणक संच भेट देण्यात आले आहे
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेचे विद्यमान चेअरमन महेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व साई फाऊण्डेशनचे चेअरमन डॉ.असिफ कासकर व नाईटिंगल चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई तसेच ग्लोबल कलर्स अण्ड केमिकल्स यांच्या सहकार्याने विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रम संपन्न करण्यात आला.या कार्यक्रमातंर्गत सग़णक संच देण्यात यावेळी सामाजिक कार्यकर्ते इक्बाल कासकर,डॉ.असिफ कासकर, डायरेक्टर विजय सावंत, डायरेक्टर परवेझ जुमानी,किशोर खामगळ,तौसिफ येरूणकर, जिग्नेश गांधी, मुख्याध्यापक अनिल खांडेकर,सहा.शिक्षक गौतम जाधव,शिल्पा मरवडे,अर्चना मरवडे, सुप्रिया वाटवे, ऋषिकेश महाडिक,सुजीत लोखंडे, नितेश पोटफोडे आदी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.