। रोहे । वार्ताहर ।
धाटाव औद्योगिक वसाहतीमधील नामांकित कोरस इंडिया लिमिटेड कंपनीतील कामगारांच्या आरोग्याच्या द्रुष्टीने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. माजी कामगार खेळू पांडुरंग वारंगे व त्यांचे सुपुत्रनिलेश वारंगे तसेच कंपनी व्यवस्थापन यांच्या विशेष सहकार्याने सदरचे शिबिर कोरस कंपनीत संपन्न करण्यात आले. यासाठी नेत्रोदय ऑप्टीशियनचे डॉ.प्रवीण शिरोडे ,घाटकोपर मुंबई यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.यावेळी व्यवस्थापक दाईटकर,चाळके,अडलिंगे,रटाटे चेतन गोसावी,भोईर व कोरस कामगार भगवान करंजे, राकेश बामुगडे,निखिल सुर्वे,विलास शिंगरे,माजी कामगार पाडगे आदी उपस्थित होते.या शिबिरात सर्वच कामगार व अधिकारी वर्ग यांनी आपल्या डोळ्यांची तपासणी केली.तर कंपनी व्यवस्थापन व निलेश वारंगे यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे धाटाव औद्योगिक वसाहतीमधील सर्वच कामगारांनी स्वागत केले आहे.