समाज सुधारकांच्या प्रतिमा भेट

। माणगाव । प्रतिनिधी ।

उष:काल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असणार्‍या विघवली विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या हायस्कुलला थोर समाजसुधारकांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. तसेच, या संस्थेतर्फे दरवर्षी समाजातील आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व इतर मदत केली जाते. यावेळी उषा शिंदे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त व आदीप दामा शिंदे यांच्या स्मरणार्थ विघवली हायस्कुलमधील नऊ गावांतील विध्यार्थ्यांना तसेच उच्च शिक्षण घेणार्‍या गरजू विध्यार्थ्यांना मंगळावरी (दि.6)संस्थाध्यक्ष महादेव बक्कम व पदाधिकारी यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी उष:काल फाऊंडेशन विश्‍वस्त तथा शाळा समिती अध्यक्ष नामदेव शिंदे, प्रभाकर उभारे, बेंडखळे गुरुजी, दिलीप उभारे, माजी मुख्याध्यापक जंगम, सरपंच वैष्णव साठे, वंदना जाधव, सखाराम शिंदे, वसंत साठे, रमेश बक्कम, मुख्याध्यापक पांडुरंग उभारे, ग्राम पंचायत सदस्य, महिला व विध्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version