युवासेना चिटणीसपदावरुन वितेज पाटील यांचा राजीनामा

। पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुका युवासेना चिटणीसपदी वितेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. कोणतीही कल्पना न देता तसेच विश्‍वासात न घेता परस्पर पदावर नियुक्ती करण्यात आली. शैक्षणिक तसेच व्यावसायिक कारणामुळे या पदाला योग्य तो न्याय देता येणार नसल्याचे कारण देत त्यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. तसेच शिवसैनिक म्हणून कार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version