विठ्ठल-विठ्ठलचे उद्या सादरीकरण

। अलिबाग । प्रतिनिधी ।
निषाद एंटरटेनमेंट निर्मित,अनंत थिएटर, पेझारी यांच्यावतीने विठ्ठल-विठ्ठल हा भक्तीमय आणि संगीतमय नाट्यकलाकृतीचे सादरीकरण शनिवार 28 मे रोजी सायंकाळी 7 वाजता पीएनपी नाट्यगृहात केले जाणार आहे.या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक कृषीवल आहे.

या कार्यक्रमाचे लेखन राजन पांचाळ यांनी केले असून, नेपथ्य मारुती बैकर, प्रमोद पाटील, निनाद पाटील, प्रकाश योजना, मिलन पाटील, पार्श्‍वसंगीत विक्रांत वार्डे, संगीत राजेंद्र म्हात्रे, पखवाज प्रतीक नाईक यांचे आहे. या कार्यक्रमात राजेंद्र म्हात्रे, ऋग्वेद म्हात्रे हे विविध गीते सादर करणार असून,त्यांना अनिल पाटील हे कोरस म्हणून साथ देणार आहेत.याशिवाय रंगभूषा सुबोध धुमाळ,उदय पाटील,वेशभूषा रश्मी पांचाळ,पार्श्‍वसंगीत सहाय्य रंजन जाधव,निर्मिती सहाय्य निनाद पाटील, सूत्रधार देवेंद्र केळुसकर, व्यवस्थापन प्रतीक पानकर,सुभाष इंदूलकर, प्रसिद्धी शुभम धुमाळ, संकल्प केळकर हे काम पाहणार आहेत.

Exit mobile version