मतदान जनजागृती प्रचार रॅली

। माणगाव । वार्ताहर ।

रायगड लोकसभा निवडणुकीसंदर्भात जनजागृती म्हणून प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजाविला पाहिजे, याबाबतची जनजागृती म्हणून माणगांव नगरपंचायत व विवा कॉलेज माणगाव यांच्यातर्फे मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या मतदान जनजागृती प्रचार प्रसिद्धी रॅलीत माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी, नायब तहसिलदार प्रभाळे, नगरपंचायतीचे कर्मचारी अतुल जाधव, विवा कॉलेजचे प्राचार्य विवेक ढेपे, उपप्राचार्य योगेश रानभरे, प्राध्यापक प्रतीक नागरगोजे, कर्मचारी, सफाई कामगार आणि कॉलेज विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version