नाईक-अंतुले महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
| म्हसळा | वार्ताहर |
वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय, म्हसळा यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाच्यावतीने 14 नोव्हेंबर रोजी मतदान जनजागृती स्विप रॅली, मोटारसायकल रॅली तसेच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन म्हसळा पंचायत समिती आणि म्हसळा नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. याशिवाय, म्हसळा मार्केट परिसरात विद्यार्थ्यांना, कर्मचारी वर्गाला आणि नागरिकांना मतदान जनजागृती प्रतिज्ञा दिली गेली.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. दिगंबर टेकळे, म्हसळा पंचायत समितीचे इऊज जाधव, नगर पंचायतचे मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचा यशस्वी समारंभ पार पडला आणि मानवी साखळी हा उपक्रम 12 नोव्हेंबर 2024 रोजी राबवला गेला. या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह आयडियल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी देखील सहभागी झाले. मतदान जनजागृती या उपक्रमांतर्गत स्विप रॅली, मोटार सायकल रॅली आणि मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि नागरिकांमध्ये मतदानाच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश साधला. विद्यार्थ्यांनी घोषणांसह रॅली काढून, मतदानाच्या महत्त्वाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन ग्रंथपाल श्री. आर. एस. मसाळे, एनएसएस विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र हालोर आणि प्रा. मयुर बढे यांनी केले. सर्व उपक्रम शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता वाढवली असून, जनतेत मतदानासाठी उत्साह निर्माण झाला.