वडवळ शाळेच्या मुलींचे कुस्तीत यश

दोन सुवर्ण, एका कांस्यपदकाची कमाई

| पाताळगंगा | वार्ताहर |

टाटा टाऊन स्पोर्टस हॉल सावरोली येथे मुंबई विभागस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये 36 किलो वजनी गटामध्ये हंसिका हरिश्‍चंद्र कुंभारने, तर 30 किलोवजनी गटामध्ये ऋतुजा राजेंद्र मरागजेने सुवर्णपदक पटकावले. तर, 46 किलो वजनी गटात जान्हवी दिनेश सकपाळ हिने कांस्यपदकाची कमाई केली. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन कमिटी वडवळ अध्यक्ष अनिल शिंद आणि उपाध्याक्षा श्‍वेता कुंभार व सर्व सदस्य, शिक्षक तसेच ग्रामस्थांच्या माध्यमातून कौतुक होत आहे.

रायगड जिल्हा परिषद शाळा वडवळ यांची महाराष्ट्र शासन क्रीडायुवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग, टाटास्टील लिमिटेड येथे कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्तीन्यास-मुंबई विभागस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत उत्तम कामगिरीमुळे या मुलींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुणे येथे निवड करण्यात आली. त्यांनी उत्तम प्रकारे कुस्ती खेळून आपल्या शाळेचे, गावाचे नाव उज्ज्वल करावे यासाठी सर्व शिक्षक, पालकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर थळे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा खालापूरचे सरचिटणीस राजाराम जाधव, विषय शिक्षक दत्तात्रय सताने, विजया शिंदे, शीतल गोळे, भिकाजी कदम त्याचबरोबर उत्तम असे कुस्ती खेळल्याने गुरु वस्ताद पै. संदेश मरागजे यांचेही अभिनंदन केले.

Exit mobile version