| माणगाव | प्रतिनिधी |
माणगावात मारुती वॅगनर वाहनाला कारची मागावून धडक बसल्याने झालेल्या अपघातात मारुती वॅगनर वाहन कालव्यात पडून वाहनाचे नुकसान झाले. या अपघातात सुदैवाने चालक सुखरूप बचावला. सदरील अपघात माणगाव नगरपंचायत हद्दीतील साईनगर भागातील कालवा नाका येथे गुरुवारी, (दि. 20) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची तक्रार संजय अनंता पालांडे (56) रा. वाकडाईनगर माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
या अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अपघाताची तक्रार देणारे संजय अनंता पालांडे हे त्यांचे मूळ गाव शिरवली येथून विठ्ठल रखुमाई देवीची पालखी उत्सव संपल्याने रात्री माणगाव येथे त्यांचा मित्र नंदकुमार रामचंद्र जाधव यांच्या मालकीची मारुती वॅगनर वाहन ही गाडी चालवीत घेऊन शिरवली येथून माणगाव येथे घरी येत असताना पाठीमागील बाजूकडून एक कार ही गाडी भरधाव वेगाने येऊन तक्रारदार यांच्या मारुती वॅगनर वाहनास पाठीमागील बाजूस धडक देऊन अपघात घडून मारुती वॅगनर गाडी कालव्यात पडून वाहनाचे नुकसान झाले. या अपघाताची माहिती समजताच माणगाव पोलीस तातडीने अपघात ठिकाणी दाखल झाले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सदर अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार घोडके करीत आहेत.
वाहनाच्या धडकेत वॅगनर कोसळली कालव्यात
