दहावीचा निकालाची प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेला होणार जाहीर

| मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर करण्यात आला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत माहिती दिली आहे. दहावीचा निकाल हा मेच्या चाैथ्या आठवड्यात म्हणजेच 27 मे पर्यंत लागेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दुजोरा दिला आहे. आता विद्यार्थ्यांसह पालकांना दहावीच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे.

या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. www.mahahsscboard.in, www.mahresult.nic.in, www.msbshse.co.in. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल. 

Exit mobile version