देवकान्हे ते चिल्हे मार्ग डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत

। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील खांब-पालदाड अंतर्गत येणार्‍या देवकान्हे ते चिल्हे मार्गाच्या प्रचंड दुरावस्थेमुळे अपघातास कारणीभूत ठरत असल्याने हा मार्ग डांबरीकरणाचे प्रतिक्षेत आहे. दिवाळी सणापूर्वी या मार्गावरील छोटे मोठे खड्डे डांबर टाकून बुझविण्यात आले. जेणेकरून या मार्गाचे पक्के डांबरीकरण करण्यात येईल. परंतु दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी या मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामास प्रारंभ न झाल्याने प्रवासीवर्ग व वाहन चालक यांच्याकडून प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. येथून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच या मार्गाची झालेली दुरावस्था पाहता डांबरीकरण करणे गरजेचे असल्याने लवकरात लवकर येथील डांबरीकरणाचे काम पुर्ण करून प्रवासीवर्ग व वाहनचालकांना होणार्‍या त्रासापासून सुटका करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Exit mobile version