वाजेकर विद्यालय स्नेहमेळावा

| उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील तू. ह. वाजेकर विद्यालय फुंडे येथील सन 1987 इयत्ता सातवीच्या बॅचमधील माजी विध्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शुभम फार्म हाऊस तारा ता. पनवेल येथे संपन्न झाले. यावेळी सुमारे 35 वर्षांनंतर जवळपास 23 माजी विद्यार्थी एकत्र येत शाळेतील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. माजी विदयार्थ्यांनी सातवी नंतरच्या 35 वर्षाच्या जीवन प्रवासातील अनुभव व बालपणीच्या आठवणींना उजाळा दिल्याने सर्वांचे चेहरे आनंदाने फुलून गेले. या प्रसंगी मनोज भगत, देवेंद्र पाटील, महादेव पाटील, देवेंद्र पाटील, प्रणिता ठाकूर, प्रतिभा म्हात्रे, विद्या पाटील, जयश्री पाटील, प्रेमा पाटील, धर्मेंद्र घरत, दिनेश भोईर, नितीन म्हात्रे, किशोर ठाकूर, रमाकांत ठाकूर, अजय पाटील, राजेंद्र कडू, भानुदास तांडेल, भुवेश तांडेल, सुनील तांडेल, विजय मढवी, विनय ठाकूर, किशोर घरत आदी सहभागी झाले होते.

Exit mobile version