अलिबाग येथे वॉक फॉर वोट रॅली

। अलिबाग । वार्ताहर ।

शहरात वॉक फॉर वोट रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. वॉक फॉर वोट रॅलीसाठी जिल्हाधिकारी जावळे यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी निर्मला कुचिक, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील, अलिबाग नगर परिषद मुख्याधिकारी अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी सेविका वैशाली पाटील यांनी लोकशाहीचा उत्सव पोवाडा सादर केला. लोकसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जनजागृती केली जात आहे. याकरिता विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत.

Exit mobile version