रस्ता रोको आंदोलनाचा इशारा

| उरण । वार्ताहर ।

उरण दिघोडे ते गव्हाण फाटा दरम्यान सतत अवजड वाहनांची वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीत प्रवाशी नागरीक, विद्यार्थी पुरता हैराण झाले आहते. याबाबत प्रशासन व्यवस्था दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत असल्याने सर्वसामान्य जनतेचा प्रवास सुखकर व्हावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते व केअर ऑफ नेचर सामजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांनी दिला आहे.

दिघोडे ते गव्हाणफाटा रस्त्यावर सातत्याने होणार्‍या वाहतूककोंडीचा त्रास येथील जनतेला नाहक सहन करावा लागत आहे. या संदर्भात प्रशासन व राजकीय यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथे सातत्याने होणार्‍या वाहतूक कोंडीतून जनतेची सुटका होऊन सनदशीर मार्गाने वाहतूक कोंडीतून सुटका झाली नाहीतर लवकरच याठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला मुंबईकर यांनी दिला आहे.

Exit mobile version