अज्ञाताकडून यंत्रणेला एसएमएस,सतर्कतेचा इशारा
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राम मंदिरावर दहशतवादी हल्ला होणारा असल्याचा मेसेज व्हॉट्सअॅपवर आल्यानं पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, एका कथित आयपीएसनं राम मंदिरावर आत्मघातकी हल्ला होण्याचा संदेश पाठवला आहे. हा मेसेज उत्तर प्रदेशच्या डायल 112 वर पाठवण्यात आलाय. याशिवाय, देशातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होण्याची भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केलीय. गुप्तचर यंत्रणांनी आपल्या कागदपत्रांचा अहवाला देत ही माहिती दिलीय.
एजन्सीनं सांगितलं की, देशातील अंतर्गत घटक देखील त्यांच्या स्वामींच्या सूचनेनुसार, अशांतता पसरवू शकतात. त्यामुळं सरकार सध्या सतर्क झालंय. पंजाबमध्ये सध्याच्या घडामोडी पाहता, समाजकंटक सक्रिय होऊ शकतात, असं सांगण्यात आलंय. गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानं सरकारनं सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क केलीय. यापूर्वी 2 डिसेंबरलाही उत्तर प्रदेशच्या डायल 112 वर अशाच हल्ल्याचा संदेश आला होता. अयोध्येत बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. ज्या क्रमांकावरून हा मेसेज आला होता, तो गुजरातचा असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं. पोलिसांनी याचाही तपास केला होता.