वासांबे ग्रामपंचायत राज्यात आठवी

| उरण | प्रतिनिधी |

माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत ग्रुप ग्रामपंचायत वासांबे यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आठवा क्रमांक, तसेच कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या या अभियानात प्रभावी अंमलबजावणी करून वासांबे ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर आपली ठळक छाप पाडली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रुप ग्रामपंचायत वासांबे यांना 50 लाख रकमेचे पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे. ही कामगिरी खालापूर तालुका व रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. या यशस्वी कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ग्रुप ग्रामपंचायत वासांबे येथील सरपंच उमा मुंडे, ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील, संदीप मुंडे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

Exit mobile version