पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त
| रायगड | प्रतिनिधी |
सतत सुरु असलेल्या पावसामुळे पालीतील अंबा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे उन्हेरे फाटा येथील पुलावर पाणी भरले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूची वाहतूक बॅरेगेटींगच्या सहाय्याने बंद करण्यात आली असून पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे खुरावले फाटा येथील भेराव गावाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावरील पुलावर देखील पाणी भरल्याने पोलीस बंदोबस्तात हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.







