| रसायनी | प्रतिनिधी |
ग्रामपंचायत तुराडे येथे ‘जल अर्पण दिवस’ पाणीपुरवठा उपविभागाचे शाखा अभियंता चव्हाण यांच्या हस्ते साजरा करण्यात आला. रसायनी परिसरातील तुराडे येथे भारत सरकारची ‘जल जीवन मिशन’ या योजने अंतर्गत1 लक्ष क्षमतेची पाण्याच्या टाकीचे काम पुर्ण करण्यात आले. त्यामुळे येथील प्रत्येक घरात पाण्याचा पुरवठा सुरळीतपणे होत असून नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी सरपंच रंजना गायकवाड यांनी डोक्यावर तांब्याच्या कलश्यात पाणी घेऊन रॅली काढली. या रॅलीत उपसरपंच लीना ठाकूर, मालती वाघमारे, रिया माळी, पूजा भोईर व स्नेहा गायकर सहभाग घेतला. त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी सुंदर रांगोळी काढून कलश पाण्याने भरून जाके अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला तुराडे सरपंच रंजना गायकवाड, उपसरपंच लीना ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य रिया माळी, मालती वाघमारे, स्नेहा गायकर, पूजा भोईर, विलास पाटील, ग्रामपंचायत अधिकारी अस्मिता मोकल, मुख्याध्यापक चोपडे यांच्यासह शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, विद्यार्थी व तुराडे ग्रामस्थ उपस्थित होते.
जल अर्पण दिवस साजरा
