। उरण । वार्ताहर ।
दडी मारलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून उरण तालुक्यात रिमझिम पडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पेरणी केलेल्या भाताच्या रोपांना पावसाचे पाणी पोषक ठरणारे असल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र, जेएनपीटी बंदराच्या परिसरातील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचून राहिल्याने त्याचा त्रास हा वाहनचालकांना, नागरिकांना सहन करावा लागत आहे.
दरम्यान, शेतकरी, विद्यार्थी व पालकांनी बाजारात जाऊन छत्री, प्लास्टिक ताडपत्री, खते, कीडनाशके खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे व्यापारीवर्ग सुखावला आहे. मात्र, रिमझिम पावसातही जेएनपीटी बंदराच्या परिसरातील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचून राहिल्याने प्रवासी नागरिकांनी, वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.